Samsung F15 5G Features In Marathi सॅमसंग F15 लॉंच झाला आहे 6000mAh बॅटरी सह, बघा काय आहेत नवीन फीचर्स ?

Samsung F15 5G Features In Marathi: साऊथ कोरियाची लोकप्रिय टेक कंपनी Samsung Galaxy ने लॉंच केला आहे नवीन 5G स्मार्टफोन. हा सॅमसंग चा F सिरिजचा स्मार्टफोन आहे आणि या सिरिजच्या नवीन स्मार्टफोन ची वाट लोक उत्सुकतेने बघत असतात. तर २०२४ मध्ये सॅमसंग ने लॉंच केला आहे  Samsung Galaxy F15 5G. पाहूया काय आहेत नवीन दमदार फीचर्स. 

डिझाईन आणि बॅटरी:

सॅमसंग ने Galaxy F15 मध्ये त्यांच्या प्रीमियम Flagship S सिरिजच्या फोन सारखे डिझाईन घेतले आहे. Galaxy F15 5G स्मार्टफोन हा स्लीम असणार आहे आणि यामध्ये फोन अनलॉक करण्यासाठी साइडला पॉवर बटनलाच फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे.  सॅमसंग F15 मध्ये बॅटरी हा महत्वाचा फीचर् आहे कारण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 6000mAh ची लिथियम बॅटरी. आणि या बॅटरी सोबत स्मार्टफोनचे वजन हे 215g असणार आहे.

 

samsung f15 5g features in marathi

डिसप्ले:

सॅमसंग F15 मध्ये डिसप्ले हा 6.5 इंच Full HD+ sAmoled असणार आहे आणि स्मूथ स्क्रोलिंगसाठी रीफ्रेश रेट हा 90Hz असेल व सोबतच डिसप्ले ब्राइटनेस 800nits आहे. 

प्रॉसेसर

सॅमसंग F15 मध्ये प्रॉसेसर Mediatek Dimensity 6100+ आहे. आणि AntuTu स्कोर बघितला तर 377K इतका आहे जो की रोजचे सामान्य कामे सुरळीत करू शकतो. आणि थोडी फार गेमिंग सुद्धा होऊ शकते.

कॅमेरा:

कॅमेरामध्ये तुम्हाला मागच्या पॅनल वर ट्रीपल कॅमेरा सेट मिळणार आहे ज्यामध्ये 50MP मेन, 5MP अल्ट्रावाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असणार आहे. आणि सेल्फी काढण्यासाठी समोर 13MP कॅमेरा दिलेला आहे. 

इतर:

सॅमसंग F15 मध्ये Galaxy A सिरिज मधला कमालचा फीचर् मिळणार आहे. ‘वॉइस फोकस’ ज्यामुळे तुम्ही फोनेवर कोणाला गर्दीमध्ये बोलत असाल आणि समोरच्या व्यक्तिला तुम्हाचा आवाज स्पष्ट ऐकू येत नसेल तर हा वॉइस फोकस ऑप्शन चालू करायचा. ज्यामुळे तुमच्या अजु-बाजूचे आवाज समोरच्या व्यक्तिला ऐकू जाणार नाही आणि तुमचा आवाज स्पष्ट ऐकायला येईल. आणि यामध्ये तुम्हाला 13 5G चे बॅंड मिळणार आहेत ज्यामुळे 5जी चा तुम्ही चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता. 

कींमत: 4GB+128GB ची कींमत आहे रु.12999 आणि  6GB+128GB मिळेल रु.14499. आणि तुम्ही दोन्ही प्रकारामध्ये 1TB पर्यंत स्टोरेज वाढवू शकता. 

Samsung F15 5G Features In Marathi

Display (डिसप्ले)6.5 Inch Full HD+ sAmoled, Refresh Rate 90Hz 
Battery (बॅटरी)6000mAh 
Rear Camera (मागचा कॅमेरा) 50MP+5MP+2MP 
Front Camera (समोरचा कॅमेरा) 13MP 
Processor (प्रॉसेसर)Mediatek Dimensity 6100+

Leave a Comment