चायनीज टेक कंपनी Realme India ने लॉंच केला आहे त्यांचा नवीन स्मार्टफोन तर जाणून घेऊया Realme 12 Plus 5G Price भारतामध्ये काय असणार आहे आणि इतर सर्व फीचर्स.
Realme ने दोन स्मार्टफोन लॉंच केले आहे Realme 12 Plus 5G आणि Realme 12 5G. आणि आज आपण Realme 12 Plus 5G च्या फीचर्स बद्दल जाणून घेणार आहोत.
Table of Contents
डिसप्ले:
Realme ने डिसप्ले मध्ये खूप जास्त फीचर्स दिले आहेत 6.67 इंच, 120Hz, OLED डिसप्ले आहे आणि सोबतच 1080*2400 FHD+ डिसप्लेचे Resulation असणार आहे. आणि कमाल ब्राइटनेस 2000nits पर्यंत पोहचू शकतो. OLED डिसप्ले असल्या कारणाने फिंगरप्रिंट सेन्सर हे डिसप्ले मधीच आहे, आणि डिसप्ले हा 8 बीट आहे व HDR 10+ चे सर्टीफिकेट सुद्धा मिळणार आहे.
कॅमेरा:
Realme 12 Plus 5G मध्ये कॅमेरा हा महत्वाचा फीचर आहे कारण कॅमेरामध्ये सोनी (Sony) चे सेन्सर असेल व Super OIS मोड आहे ज्याच्या मदतीने विडियो खूप स्मूथ येणार आहेत. मागच्या पॅनलवर तीन कॅमेरा आहेत ज्यामध्ये 50MP+8MP+2MP आणि समोर 16 मेगा पिक्सेल AI सेल्फी कॅमेरा आहे.
प्रॉसेसर:
Realme 12 Plus 5G मध्ये प्रॉसेसर हे Dimensity 7050 आहे आणि ते 6nm असून 2.6 GHz वर काम करते आणि AntuTu स्कोर 600K वर जातो त्यामुळे गमिंगसाठी हा स्मार्ट फोन चांगला ठरणार आहे.
बॅटरी बॅकअप
Realme ने बॅटरी बॅकअप मध्ये काही तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला नाही. Realme 12 Plus 5G मध्ये 5000mAh बॅटरीसह 67Watt चार्जिंग सपोर्ट असणार आहे. ज्यामुळे चार्जिंग अगदी काही मिनिटात होणार आहे.
Realme 12 Plus 5G Price (स्टोरेज आणि रॅम):
Realme 12 Plus 5G मध्ये स्टोरेज टाइप हा UFS 3.1 आहे ज्यामुळे एखादी फाइल मुव किंवा कॉपी करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. तर Realme 12 Plus 5G Price जाणून घेऊया. या स्मार्टफोन मध्ये दोन प्रकार आहेत 8GB/128GB ज्याची किंमत 20,999रु आहे आणि 8GB/256GB ची किंमत 21,999रु इतकी आहे.