Bandhkam Kamgar Yojana Benefits In Marathi या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम कामगार योजनेबद्दल A To Z संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, बांधकाम कामगार योजना काय आहे, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार महामंडळ अंतर्गत राबवण्यात येणार्या विविध योजना (शिक्षणा विषयी, आरोग्या विषयी, कामगारा विषयी व इतर) संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.
Table of Contents
बांधकाम कामगार योजना काय आहे ?
अगोदरपासूनच शेतकर्यांसाठी व कामगारांसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातील Bandhakam Kamgar ही एक योजना आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात काम करणारे कामगारांचे जीवन उज्वल व्हावे व त्यांना विविध प्रकारे आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना आहे. ज्यामध्ये कामगाराला रोजगार मिळून देणे, कामगाराच्या मुलाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्य विषयी समस्या दूर करण्यासाठी अर्थीक मदत देणे, कामगाराच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकारचे साहित्य पुरवणे, आणि या योजने द्वारे पावलो पावली कामगारांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात.
बांधकाम कामगार पेटी योजना (Bandhkam Kamgar Peti Yojana)
बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कामगाराची “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये” नोंदणी असणे आवश्यक आहे. आणि नोंदणी झाल्या नंतर लगेच तुम्हाला बांधकाम कामगार पेटी योजने अंतर्गत एक पेटी म्हणजेच Safety Kit मिळते. त्या पेटीमध्ये कामगाराच्या सुरक्षितेसाठी काही वस्तु असतात ज्या की कामगाराला काम करता वेळेस उपयोगी पडतात.
बांधकाम कामगार पेटी योजनेमध्ये मिळणार्या वस्तूंची यादी
१.सेफ्टी बूट
२.सोलर टॉर्च
३.सोलर चार्जर
४.बॅग
५.जॅकेट
६.पाण्याची बॉटल
७.मच्छरदानी जाळी
८.हात मोजे
९.चटई
१०.सेफ्टी हेलमेट
११.जेवणाचा डब्बा
बांधकाम कामगारांना मिळणार गृहपयोगी वस्तूंचा संच
बांधकाम कामगार कामासाठी नेहमी स्थलांतरित करीत असतो. अगदी कुटुंबासह एका साईटवरील काम झाले की नवीन बांधकामाच्या ठिकाणी, अशा वेळेस त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो जसे कि त्यांच्या निवासस्थानी सोय, मुलांचे शिक्षण आणि आरोग्याविषयी समस्या, सोबतच भोजनाची मोठी गैरसोय होते, तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने ही योजना अंबलात आणली.
गृह उपयोगी वस्तूंचा संच कोणाला मिळणार ?
जे कामगार “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” या योजनेत नोंदणीकृत आहेत व जे बांधकाम कामगार सक्रिय (Active) आहेत. ‘सक्रिय’ म्हणजे ज्या कामगाराने आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले बांधकाम कामगार मंडळाकडे नोंद केलेली असून त्यांचे कोणतेही Renewal बाकी नाही अशा सर्व कामगारांना हे गृह उपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे.
बांधकाम कामगार योजना 2024 चा लाभ कामगार कशा प्रकारे घेऊ शकतात ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत कामगाराला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले बांधकाम कामगार मंडळाकडे जावे लागेल व तेथे योजने बद्द्ल अर्ज भरून द्यावा लागेल आणि आजकाल काही लोक सरकारकडून राबवण्यात आलेल्या अश्या योजनांचा गैरफायदा घेतात तर हे टाळण्यासाठी कामगाराला त्यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पध्दतीने बोटांचे ठसे बांधकाम कामगार मंडळाकडे देणे अनिवार्य आहे.
Bandhkam Kamgar Yojana 2024 गृहपयोगी वस्तूंची यादी
Bandhkam Kamgar Yojana 2024 मध्ये कामगारांना Rs.8000 रुपये किमतीच्या 30 वस्तूंचा संच मिळणार आहे ज्यामधे खालील वस्तूंचा समावेश आहे.
ताट | ०४ |
वाट्या | ०८ |
पाण्याचे ग्लास | ०४ |
पातेले झाकणासह (१२ इंच) | ०१ |
पातेले झाकणासह (१३ इंच) | ०१ |
पातेले झाकणासह (१४ इंच) | ०१ |
पाण्याचा जग (१.५ लिटर) | ०१ |
मसाला डब्बा (०७ भाग) | ०१ |
मोठा चमचा (वरण वाटपाकरिता) | ०१ |
मोठा चमचा (भात वाटपाकरिता) | ०१ |
डब्बा झाकणासह (१४ इंच) | ०१ |
डब्बा झाकणासह (१६ इंच) | ०१ |
डब्बा झाकणासह (१८ इंच) | ०१ |
परात | ०१ |
प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील) | ०१ |
कढई (स्टील) | ०१ |
स्टीलची टाकी झाकणासह (मोठी) | ०१ |
एकूण | ३०(तीस) |
सामाजिक सुरक्षा
सामाजिक सुरक्षा अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ द्वारे विविध योजना आहेत, ज्यामधे खाली दिलेल्या योजनांचा समावेश होतो.
१.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
२.प्रधानमंत्री जीवनज्योति विमा योजना
३.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
४.पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
५.पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/- आर्थिक मदत
शैक्षणिक योजना
शिक्षणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ द्वारे खूप योजना आहेत ज्यामुळे कामगाराच्या पाल्यांसाठी इयत्ता १ ते पदवी करेपर्यंतचा शैक्षणिक खर्चात आर्थिक मदत दिली जाते.
टीप- खाली दिलेल्या सर्व शैक्षणिक योजना कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांनाच लागू होतील.
१. इयत्ता १ त ७ च्या विध्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु.२५००/-
२. इयत्ता ८ ते १० च्या विध्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु.५०००/-
३. ११वी ते १२वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु.१०,०००/-
४. १०वी व १२वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु.१०,०००/-
५.पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रु.२०,०००/- (ही योजना नोंदीत कामगाराच्या पत्नीलाही लागू होते).
६.वैद्यकीय पदविकरिता प्रतिवर्ष रु.१,००,०००/-
७.अभियांत्रिकी पदविकरिता प्रतिवर्ष रु.६०,०००/-
८.संगणकाचे MS-CIT च्या शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ति.
शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागतपत्र
- विध्यार्त्यांचे आधार कार्ड
- विध्यार्त्यांच्या शाळेचे बोनफाईड सर्टिफिकेट
- मागील वर्गातील ७५% पेक्षा जास्त हजार असल्याचा शाळेचा दाखला
- रेशन कार्ड
शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे .
- येथे आल्यानंतर “दाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करावे.
- नंतर एक पेज उघडेल, त्यावर विचारलेली माहिती भरून सर्व आवश्यक कागतपत्र अपलोड करून घ्यावी.
- शेवटी एक पर्याय दिसेल अपॉईंटमेंट चा, त्यामध्ये तुम्हाला एक तारिख निवडावी लागेल, आणि त्याच तारखीला अपॉईंटमेंट लेटर आणि आवश्यक कागतपत्र घेऊन आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला भेट द्यावी लागेल. तेथील अधिकारी कागतपत्र पडताळणी करतील आणि मग अर्ज मंजुर झाल्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल.
आरोग्यविषयक योजना
- विनाशुल्क आरोग्य तपासणी
- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना
- गंभीर आजाराच्या उपचारासाठी रु.१,००,००० /- (नोंदनिकृत कामगार व त्याच्या/तिच्या कुटुंबीयांना)
- नैसर्गिक प्रसूतीसाठी रु.१५,०००/- आणि शास्त्रक्रीएद्वारे प्रसूतीसाठी रु.२०,०००/- (दोन जीवित आपत्यांसाठी).
- रु.२,००,००० ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रु.२,००,०००
- इतर
इतर आर्थिक मदत
- कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रु.५,००,०००/- (कायदेशीर वरसास)
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु.२,००,०००/- (कायदेशीर वरसास)
- गृहकर्जावरील रु.६,००,०००/- पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रु.२,००,०००/-
- इतर