Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 विहीर अनुदान योजने अंतर्गत 4 लाखा पर्यन्तचे अनुदान

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील पिकांना पाण्याची कमतरता न भासवी यासाठी शासनाकडून ४ लाखापर्यंत अनुदान देण्यात येते.

अनियमित पाऊस किंवा पावसाची कमतरता असल्या कारणाने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमात नुसकण होते व त्यांचे जीवन चक्र शेतातील पिकांवर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो. ज्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन जातो. याच समस्याचे निवारण करण्यासाठी व शेतकर्‍यांना विविध सिंचांनाच्या पद्धती उपलबद्ध व्हाव्या म्हणून महाराष्ट्र शासनाने Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 ही योजना अंबलात आणली.

विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता

१.शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

२.लाभार्थी शेतकर्‍याकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असणे आवश्यक आहे.

३.शेतकर्‍याकडे अगोदरपासून विहीर जल सिंचन असल्यास तो शेतकरी अपात्र ठरेल.

४.शेतकर्‍याला ज्या ठिकाणी विहीरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून ५०० मीटर पर्यन्त कोणतीही विहीर नसायला हवी. असल्यास शेतकर्‍याचा अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.

५.अर्जदारकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 साठी लागणारे कागतपत्र

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबूक (आधार नं. लिंक असणे आवश्यक आहे)
  • राशन कार्ड
  • रोजगार हमीचे जॉब कार्ड
  • जनिमीचा ७/१२ आणि ८ अ
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • सामूहिक विहीर असल्यास ०.४० हेक्टर पेक्षा अधिक जाणीन असल्याचा पंचनामा.

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्यासाठी लाभार्थी शेतकर्‍याला त्याच्या क्षेत्रातील जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जावे लागेल व तेथील ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयातील कृषि विभागात सुद्धा अर्ज मिळतो.
  • त्या फॉर्म मध्ये संपूर्ण व्यक्तिक माहिती भरून व आवश्यक कागतपत्र जोडून तो अर्ज सबमिट करावा.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा ?

  1. सर्वप्रथम लाभर्थ्याला विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  2. नंतर होमपेज उघडेल त्यावर सर्व व्यक्तिक माहिती भरून आवश्यक कागतपत्र अपलोड करावे.
  3. अशा पद्धतीने विहीर अनुदान योजनेचा लाभ शेतकरी बांधव घेऊ शकतात.     

Leave a Comment