Blue Aadhaar Card For Kids 2024 लहान मुलांचे ब्लू आधारकार्ड साठी अर्ज कसा करावा

Blue Aadhaar Card For Kids: लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड काढण्यास सुरवात झाली आहे. प्रोढांसाठी जसे नियमित सामान्य आधार कार्ड असते तसेच पाच वर्षा खालील मुलांसाठी निळे आधार कार्ड काढणे आवश्यक आहे. आणि हे आधार कार्ड मूल ५ वर्षाचे होईपर्यंत वैध राहील. पाच वर्ष झाल्यानंतर मुलांची बाओमेट्रिक माहिती (बोटांचे ठसे) अपडेट करणे आवश्यक आहे जे कोणत्याही जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन करता येते.

Blue Aadhaar Card For Kids कसे काम करते ?

ब्लू आधारकार्ड साठी मुलांची बाओमेट्रिक माहिती म्हणजे (बोटांचे ठसे) घेण्याची आवश्यकता नाही कारण पालकांच्या आधारकार्ड वरील बाओमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती वरुणच UID द्वारे लहान मुलांचे निळे आधारकार्ड तयार करण्यात येते.

ब्लू आधारकार्ड का म्हत्वाचे आहे ?

ब्लू आधारकार्ड खूप म्हत्वाचे आहे कारण काही शाळांमध्ये प्रवेश घेतावेळेस ब्लू आधारकार्ड अनिवार्य आहे व शाळेमध्ये EWS शिष्यवृती मिळण्यास मदत करते. आणि लहान मुलांसाठी शासनाच्या काही योजना असतात तर त्यांचा लाभ घेण्यासाठी या आधारकार्डचा उपयोग होतो.

blue aadhaar card for kids

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागतपत्र

  • जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटलचे डिस्चार्ज स्लिपचा वापर करुण पालक मुलांच्या ब्लू आधारकार्ड साठी अर्ज करू शकतात.
  • बाळाच्या शाळेचा आयडी देखील अर्ज करण्यास उपयोगी पडतो.
  • पालकचे आधार कार्ड.
  • पत्त्याचा पुरावा (Address Proof).

ब्लू आधारकार्ड साठी नोंदणी कशी करावी?

  • सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • वेबसाइटवर आल्यानंतर आधार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • आणि नंतर मुलाचे नाव, पालकाचे नाव आणि मोबाइल नंबर टाकून तुम्हाला ज्या दिवशी आधार केंद्रावर जाण्यास योग्य वाटेल, त्या दिवसाची अपॉईंटमेंट स्लॉटमध्ये निवड करा.
  • आवश्यक कागतपत्रे घेऊन, अपॉईंटमेंटच्या दिवशी जवळच्या आधार केंद्राला भेट द्या.
  • नोंदणी झाल्यानंतर कागतपत्रे पडताळणी प्रक्रिया चालू होते आणि ६० दिवसाच्या आत तुमच्या मुलाचे ब्लू आधारकार्ड जारी केले जाते.   

Leave a Comment