Sanman Dhan Yojana 2024 सन्मान धन योजना २०२४ बद्दल संपूर्ण माहिती

राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे Sanman Dhan Yojana 2024 अंतर्गत महाराष्ट्र घरेलू कामगारांना रु.१०,०००/- रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्य शासनाकडून यासाठी GR काढण्यात आलेला आहे. सन्मान धन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कामगार पात्र असतील आणि काय आहे राज्य शासनाचा GR. याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

शासन निर्णय:

शासनाने निर्णय घेतला आहे की, नोंदणीकृत घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडून दरवर्षी ३१ डिसेंबर ला ज्या जीवित नोंदणीकृत कामगारांना ५५ वर्ष पूर्ण झाले आहेत अशा पात्र कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडून त्यांच्या निधीतून Sanman Dhan Yojana 2024 अंतर्गत रुपये १०,०००/- एवढी रक्कम थेट डीबीटी द्वारे कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Sanman Dhan Yojana 2024 साठी पात्रता:

  • यापूर्वी कामगाराने सन्मानधन योजनेचा लाभ घेतलेला नसावा. असल्यास ते कामगार अपात्र ठरतील.
  • लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यापूर्वी, लाभार्थी हा जीवित नोंदनिकृत व पात्र असल्याची खात्री विकास आयुक्त कार्यालयाकडून करण्यात यावी.

प्रक्रिया:

  • कामगाराला लवकरात-लवकर या योजनेचा लाभ मिळावा व लाभार्थ्याची गैरसोय होऊ नये यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत योजनेचा निधि वाटप करण्यात यावा.
  • महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रकल्पासाठी प्रतेक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधि हस्तांतरीत करावा.

Leave a Comment