महाराष्ट्र पोलिस विभागाणे विविध 17471 पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे आणि Police Bharti 2024 Online Form Date ही 5 मार्च ते 31 मार्च असणार आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती, की पात्रता काय असणार आहे ? आवश्यक कागटपत्रे, अर्ज करण्याची प्रकिया आणि महाराष्ट्र पोलिस भरती बद्दल इतर सर्व माहिती.
Table of Contents
महाराष्ट्र पोलिस विभागाणे 29 फेब्रुवरी 2024 रोजी नोटिस पाठवले. ज्या मध्ये पोलिस कॉंन्स्टेबल सशस्त्र, पोलिस कॉंन्स्टेबल ड्रायवर, जेल वॉर्डन अशा विविध 17471 पदांसाठी ही भरती असणार आहे.
Police Bharti 2024 Online Form Date
अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक: 5 मार्च 2024 पासून.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक: 31 मार्च 2024 असणार आहे.
सर्व उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जातील.
पात्रता
शैक्षणिक पात्रता:
पोलिस कॉंन्स्टेबल पदासाठी उमेदवारला एचएससी (१२वी) किंवा (१०वी+२) शिक्षण मान्यताप्राप्त मंडळाकडून केलेले असावे किंवा १२वी च्या समकक्ष उतीर्ण असणे आवश्यक आहे. उपनिरीक्षक (सब-इंस्पेक्टर) पदासाठी उमेदवाराची पदवी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालत समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
वय:
उपनिरीक्षक (सब-इंस्पेक्टर) पदासाठी वयाची अट 19 ते 28 असणार आहे आणि हवालदार (कॉंन्स्टेबल) पदासाठी वयाची अट 18 ते 28 राहणार आहे. (ओबीसी– 3 वर्ष सूट आणि एससी- 5 वर्ष सूट).
राष्ट्रीयत्व:
उमेदवार हा भारतीय नागरिक असून महाराष्ट्रातील रहिवाशी असावा.
शारीरिक पात्रता:
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF – 168 सेमी) | 158 सेमी पेक्षा कमी नसावी |
छाती (केवळ मुलांसाठी) | न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी | – |
अटी व शर्ती
- Maharashtra Police Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जातिल.
- उमेदवार हा एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकासाठीच अर्ज करू शकतो.
- उमेदवाराने कोणत्याही प्रकारची चुकीची मीहिती दिल्यास त्याला कोणत्याही टप्यात रद्द करण्यात येईल.
महाराष्ट्र पोलिस भरती २०२४ अर्जासाठी लागणारी फी
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४५०/- अर्ज फी असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३५०/- अर्ज फी राहणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- पेमेंट प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे आणि पेमेंट केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.
पोलिस भरती २०२४ निवड प्रक्रिया:
- 2024 च्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये प्रथम चाचणी ही शारीरिक चाचणी असणार आहे .
- त्यानंतर शारीरिक मोजमाप चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी.
ह्या सर्व चाचण्या झाल्या नंतर कागतपत्रे पडताळणी आणि शेवट वैद्यकीय तपासणी.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात अगोदर पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.(https://www.mahapolice.gov.in/)
- संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर भरती असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपली व्ययक्तिक माहिती भरून नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणी केल्यानंतर आवश्यक कागटपत्रे अपलोड करा आणि ऑनलाइन पेमेंट करून घ्या.
- नंतर सर्व माहिती तपासून घ्या आणि अर्ज सबमिट करा.