PM किसान सम्मान निधि योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा दोन्हीही योजनांचे हप्ते आज दिनांक २८ फेब्रुवारी ला शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत.
PM किसान सम्मान निधी चा १६ वा हप्ता जमा होणार असून सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी चे दोन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभाचा राहणार आहे.
PM किसान सम्मान निधि योजना
या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. आतापर्यंत १५ हप्ते जमा झालेले असून आज १६ वा हप्ता मिळणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
राज्य सरकारने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधि योजना सुरू केली आहे ही योजना पीएम किसान योजनेच्या धोरणावर आधारित आहे. म्हणजे पीएम किसान योजने प्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. दर ४ महिन्यांनी २ हजार रुपये खत्यात जमा केले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला भेट देणार आहेत आणि तेथेच कार्यक्रमात १६ व्या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ करणार आहेत. आज शेतकऱ्यांना एकूण ६ हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान योजनेचे २ हजार आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता अशे एकूण सहा हजार रुपये राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.