Xiaomi 14 लॉन्च होत आहे 7 मार्च ला, बघा काय आहेत नवीन फीचर्स ?

Xiaomi 14: चायनीज टेक कंपनी ‘शाओमी इंडिया’ लॉन्च करीत आहे Xiaomi 14 भारतामधी लवकरच. हा लॉन्च इव्हेंट 7 मार्च ला राहणार आहे आणि या इव्हेंट मधीच Xiaomi 14 लॉन्च होणार आहे. हा शाओमी कंपनी चा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे.

Xiaomi 14 चीन मध्ये लॉन्च झालेला आहे. तिथे हा फोन चार मेमोरी प्रकारा मध्ये लॉन्च झाला आहे. चीनमध्ये याची किंमत 3999 युआन (सुमारे 46,000 रुपये) ते 4999 युआन (सुमारे 57,000 रुपये) दरम्यान आहे. तर भारतामधी ह्या फोन ची काय किंमत राहणार आहे? आणि कोणते अपेक्षित नवीन Features आपल्याला मिळू शकतात हे आपण बघणार आहोत.


Xiaomi 14 किंमत

भारतामध्ये Xiaomi 14 ची किंमत सुमारे 40 हजार च्या दरम्यान असू शकते.

स्टोरेज: या स्मार्टफोन मधी तुम्हाला चार प्रकार मिळणार आहेत.
(8GB RAM + 256GB स्टोरेज), (12GB RAM + 256 GB स्टोरेज ), (16GB RAM + 512GB स्टोरेज) आणि (16GB RAM + 1TB स्टोरेज).

डिस्प्ले: शाओमी 14 स्मार्टफोनमध्ये स्क्रीन साइज 6.36 इंच असेल आणि पंच होल OLED डिस्प्ले असणार आहे आणि सोबतच हा 120Hz रिफ्रेश रेट वर कार्य करेल व त्याची कमाल (Maximum) ब्राईटनेस 3000nits राहील.

कॅमेरा: Xiaomi 14 मध्ये मागील पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा असेल, त्यामधी प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेल, 50 मेगापिक्सेल वाईड अँगल सोबतच 64 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स असणार आहे. आणि समोर 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल.

xiaomi 14 price in india

प्रोसेसर: गेमिंग आणि Ultra Boost Performance साठी शाओमी 14 मध्ये Qualcomm Snapdragon 8 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून ते 4 नॅनोमीटर बेसवर असेल आणि तो 3.3 GHz क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक साठी Adreno 750GPU आहे. शाओमी 14 मध्ये नवीन ऑपरेटिंग सस्टिम Hyper OS आहे आणि यामधी लेटेस्ट Android 14 असेल.

बॅटरी: Xiaomi 14 मध्ये बॅटरी बॅकअप साठी लेटेस्ट तंत्रज्ञान वापरले गेले आहे यामध्ये 4,610mAh बॅटरीसह 90W फस्ट चार्जिंग मिळणार आहे.

इतर फिचर्स: फोनमध्ये IP68 रेटिंग, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट, USB Type-C 3.2 Gen 1 आणि Wifi 7 सारखी इतर खूप सारे नवीन फिचर्स मिळतील.

Xiaomi 14 All Specifications:

कींमत (Prize)Approx. Rs.40,000
डिसप्ले (Display)6.36 Inch, OLED, 120Hz Refresh Rate, Max.3000nits Brightness.
कॅमेरा (Camera)Rear 50MP+50MP+64MP, Front 32MP
प्रोसेसर (Processor)Qualcomm Snapdragon 8 Gen 3 , 4nm, Graphic- Adreno 750GPU, 3.3 GHz clock speed
स्टोरेज (Storage)(8GB RAM + 256GB), (12GB RAM + 256), (16GB RAM + 512GB) And (16GB RAM + 1TB )
बॅटरी (Battery)4,610mAh with 90 Watt Charging.
इतर (Other)IP68 Rating, USB Type-C 3.2 Gen 1 & Wifi 7 etc.

Leave a Comment