Bandhkam Kamgar Yojana 2024 बांधकाम कामगारांना मिळणार गृहोपयोगी वस्तूंचा संच

Bandhkam Kamgar Yojana 2024: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना मिळणार गृहोपयोगी वस्तूंचा संच.

बांधकाम कामगार कामासाठी नेहमी स्थलांतरित करीत असतो. अगदी कुटुंबासह एका साईटवरील काम झाले की नवीन बांधकामाच्या ठिकाणी, अशा वेळेस त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो जसे कि त्यांच्या निवासस्थानी सोय, मुलांचे शिक्षण आणि आरोग्याविषयी समस्या, सोबतच भोजनाची मोठी गैरसोय होते, तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने ही योजना अंबलात आणली.

गृह उपयोगी वस्तूंचा संच कोणाला मिळणार ?

जे कामगार “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” या योजनेत नोंदणीकृत आहेत व जे बांधकाम कामगार सक्रिय (Active) आहेत. ‘सक्रिय’ म्हणजे ज्या कामगाराने आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले बांधकाम कामगार मंडळाकडे नोंद केलेली असून त्यांचे कोणतेही Renewal बाकी नाही अशा सर्व कामगारांना हे गृह उपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे. 

कामगार कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत कामगाराला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले बांधकाम कामगार मंडळाकडे जावे लागेल व तेथे योजने बद्द्ल अर्ज भरून द्यावा लागेल आणि आजकाल काही लोक सरकारकडून राबवण्यात आलेल्या अश्या योजनांचा गैरफायदा घेतात तर हे टाळण्यासाठी कामगाराला त्यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पध्दतीने बोटांचे ठसे बांधकाम कामगार मंडळाकडे देणे अनिवार्य आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024 गृहपयोगी वस्तूंची यादी

Bandhkam Kamgar Yojana 2024 मध्ये कामगारांना Rs.8000 रुपये किमतीच्या 30 वस्तूंचा संच मिळणार आहे ज्यामधे खालील वस्तूंचा समावेश आहे.

ताट०४
वाट्या०८
पाण्याचे ग्लास०४
पातेले झाकणासह (१२ इंच)०१
पातेले झाकणासह (१३ इंच)०१
पातेले झाकणासह (१४ इंच)०१
पाण्याचा जग (१.५ लिटर)०१
मसाला डब्बा (०७ भाग)०१
मोठा चमचा (वरण वाटपाकरिता)०१
मोठा चमचा (भात वाटपाकरिता)०१
डब्बा झाकणासह (१४ इंच)०१
डब्बा झाकणासह (१६ इंच)०१
डब्बा झाकणासह (१८ इंच)०१
परात०१
प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील)०१
कढई (स्टील)०१
स्टीलची टाकी झाकणासह (मोठी)०१
                                 एकूण३०(तीस)

सन्मान धन योजना २०२४ बद्दल संपूर्ण माहिती.

सुकन्या समृधी योजना 2024 संपूर्ण माहिती.

Leave a Comment