नमस्कार! आज आपण सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana 2024) बद्द्ल संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जसे की Sukanya Samriddhi Yojana 2024 चे फायदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे.
Table of Contents
सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठीच आहे, ही योजना पालकांना त्यांच्या मुलींच्या भावी शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. Sukanya Samriddhi Yojana 2024 साठी पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही बँक मध्ये मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.
Sukanya Samriddhi Yojana 2024 चे फायदे
- कमीत – कमी गुंतवणूक रू.250 प्रतिवर्ष आहे, आणि जास्तीत- जास्त रू.1.5 लाख प्रतिवर्ष एवढी आहे.
2.या योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर मिळतो 8.2% (01.01.2024 पासून).
3.जमा केलेली मूळ रक्कम आणि संपूर्ण कार्यकाळात मिळालेले व्याज हे कलम 80C अंतर्गत करमुक्त (Tax Free) आहे. - मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा 10 वी झाल्यानंतर पैसे काढता येतात.
Sukanya Samriddhi Yojana 2024 साठी पात्रता
1.मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे.
2.या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडले जाऊ शकते.
3.या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
आवश्यक कागतपत्रे
1.मुलीचा जन्म दाखला
2.अर्जदाराचे पालक यांचा फोटो आयडी
3.अर्जदाराचे पालक यांचा पत्ता पुरावा
4.KYC कागतपत्रे जसेकी, पॅन कार्ड, मतदान आयडी
5.Sukanya Samriddhi Yojana 2024 (SSY) खाते उघडण्याचा फॉर्म
6.बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारा विनंती केलेले इतर कोणतेही कागतपत्रे.
अर्ज प्रक्रिया
सुकन्या समृद्धी योजना (SSY) कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत उघडले जाऊ शकते. खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्यात.
1.तुम्हाला ज्या बँक मधी खाते उघडायचे आहे, त्या बँक मधी जाऊन आवश्यक माहितीसह अर्ज भरा आणि तेथे लागणारे कागटपत्रे दया.
2.खाते Active करण्यासाठी प्रथम ठेव जमा करा (रू.250 ते रू.1.5 लाख दरम्यान).
3.तुमचा अर्ज आणि पेमेंटची प्रक्रिया बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे केली जाईल.
4.प्रक्रिया केल्यानंतर तुमचे सुकन्या समृद्धी खाते सक्रिय केले जाईल.खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुक पुरवले जाईल.
बांधकाम कामगारांना मिळणार गृहउपयोगी वस्तूंचा संच. बांधकाम कामगार योजना 2024 संपूर्ण माहिती.